Share

मोदींच्या इंधन दरकपात धोरणाचे इम्रान खान यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “आपल्या असंवेदनशील सरकारने…”

Published On: 

नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदी सरकारचे कौतुक करणारे ट्वीट केले आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतीलिटर ३० रुपयांनी वाढवले आहेत. तसेच केरोसिनच्या किंमतीतही ३० रुपयांनी वाढ केली असून दर १५५ रुपये ५६ पैसे झाला आहे. असे असताना त्यांनी मोदी सरकारने केलेल्या इंधन दरकपात धोरणाचे कौतुक केले आहे.

“पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर २० टक्क्यांनी वाढ करत देशाने आयात केलेल्या सरकारच्या अधीनतेसाठी किंमत मोजायला सुरुवात केली आहे. इतिहासातील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. आपल्या अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकारने रशियाकडून ३० टक्के स्वस्त तेलासाठी केलेल्या कराराचा पाठपुरावा केला नाही”, असे ट्वीट इम्रान खान यांनी केले आहे.

याउलट अमेरिकेचा धोरणात्मक सहकारी असलेल्या भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून इंधनाच्या किंमती २५ रुपयांनी कमी केल्या आहेत. आता आपल्या देशाला बदमाशांच्या हातून महागाईचा आणखी एक मोठा डोस सहन करावा लागणार आहे. अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!