पुणे : महिला टी-२० चॅलेंज (Women’s T20 Challenge 2022 )स्पर्धेत स्मृती मंधानाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ट्रेलब्लेझर्सने व्हेलॉसिटीचा (VEL vs TRL) १६ धावांनी पराभव केला. पण या विजयानंतरही ट्रेलब्लेझर्सला अंतिम फेरीत जाता आले नाही. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात व्हेलॉसिटीची कप्तान दीप्ती शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर सभिनेनी मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर ट्रेलब्लेझर्सने व्हेलॉसिटीला १९१ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीकडून महाराष्ट्राच्या किरण नवगिरेने स्पर्धेतील वेगवान अर्धशतक झळकावले, पण तिला दुसऱ्या बाजूने साथ लाभली नाही. २० षटकात व्हेलॉसिटीला ९ बाद १७४ धावांपर्यंतच पोहोचता आले. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ट्रेलब्लेझर्सला ३१ धावा राखून विजय मिळवण्याचील आवश्यकता होती, पण तसे झाले नाही. आता फायनलमध्ये व्हेलॉसिटीचा सामना हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हासशी होणार आहे.
व्हेलॉसिटीचा डाव
ट्रेलब्लेझर्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांनी दमदार सुरुवात केली. शफालीने ५ चौकारांसह २९ धावा फटकावल्या, तर यास्तिकाने १९ धावा केल्या. सलमा खातूनने भाटियाची दांडी गूल केली, तर राजेश्वरी गायकवाडने शफालीला पायचीत पकडले. महाराष्ट्राच्या किरण नवगिरेने आपली चमक दाखवत फटकेबाजी केली. तिने या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक (२५ चेंडू) ठोकले. दुसऱ्या बाजूने तिला साथ मिळाली नाही आणि ठराविक अंतराने विकेट्स पडत राहिल्या. १७व्या षटकात सोफिया डंकलेने नवगिरेला बाद करत व्हेलॉसिटीला जबर धक्का दिला. नवगिरेने ३४ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६९ धावांची झुंज दिली. शेवटच्या षटकात व्हेलॉसिटीला विजयासाठी २४ धावांची गरज होती, पण त्यांना हे लक्ष्य गाठता आले नाही. २० षटकात व्हेलॉसिटीने ९ बाद १७४ धावा केल्या. ट्रेलब्लेझर्सकडून राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
Kiran Prabhu Navgire's massive Six into the Stands ????#WT20Challenge #CricketTwitter pic.twitter.com/SuxIEhmege
— Female Cricket (@imfemalecricket) May 26, 2022
Trailblazers won by 16 Runs but couldn't qualify for the Finals based on their NRR. #CricketTwitter #WomensT20Challenge pic.twitter.com/MIwaRHfucy
— Female Cricket (@imfemalecricket) May 26, 2022
ट्रेलब्लेझर्सचा डाव
ट्रेलब्लेझर्सची कप्तान स्मृती मंधाना (१) स्वस्तात बाद झाल्यानंतर सभिनेनी मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी दमदार शतकी भागीदारी रचली. केट क्रॉसने मंधानाला सिमरन बहादूरकरवी झेलबाद केले. मेघनाने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. १५व्या षटकात स्नेह राणाने मेघनाला झेलबाद करत सुटकेचा निश्वास टाकला, पण रॉड्रिग्सने फटकेबाजी सुरू ठेवली आणि अर्धशतक पूर्ण केले. व्हेलॉसिटीकडून खेळाडूंनी सुमार क्षेत्ररक्षण करत अनेक झेल सोडले. १७व्या षटकात रॉड्रिग्सने खाकाला चुकीचा फटका खेळला आणि ती स्नेह राणाकरवी झेलबाद झाली. रॉड्रिग्सने ७ चौकार आणि एका षटकारासह ६६ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये हेली मॅथ्यूज आणि सोफिया डंकले यांनी फटकेबाजी केली. सिमरन बहादुरने टाकलेल्या २०व्या षटकात या दोघी बाद झाल्या. डंकलेचा राधा यादवने सुंदर झेल घेतला. डंकलेने ७ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १९ धावा केल्या. तर मॅथ्यूजने १५ चेंडूत ४ चौकारांसह २७ धावा केल्या. २० षटकात ट्रेलब्लेझर्सने ४ बाद १९० धावा केल्या.
दोन्ही संघांची Playing 11-
ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधाना (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जेमिमा रॉड्रिग्स, सोफिया डंकले, सभिनेनी मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, सलमा खातून, पूनम यादव, रेणुका सिंग, राजेश्वरी गायकवाड.
व्हेलॉसिटी – शफाली वर्मा, नटकन चँथम, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड, दीप्ती शर्मा (कर्णधार), किरण नवगिरे, स्नेह राणा, राधा यादव, केट क्रॉस, अयाबोंगा खाका, सिमरन बहादूर.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

