Share

Women’s T20 Challenge 2022 VEL vs TRL : ट्रेलब्लेझर्सची व्हेलॉसिटीपुढं ‘विक्रमी’ धावसंख्या; मेघना, रॉड्रिग्स यांची अर्धशतके!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेत (Women’s T20 Challenge 2022 )आज ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी (VEL vs TRL) यांच्यात महत्त्वपूर्ण सामना खेळवला जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात व्हेलॉसिटीची कप्तान दीप्ती शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर सभिनेनी मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर ट्रेलब्लेझर्सने व्हेलॉसिटीला १९१ धावांचे आव्हान दिले आहे. या स्पर्धेत एवढी धावसंख्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ट्रेलब्लेझर्सला ३२ धावा राखून विजय मिळवावा लागणार आहे.

ट्रेलब्लेझर्सचा डाव

ट्रेलब्लेझर्सची कप्तान स्मृती मंधाना (१) स्वस्तात बाद झाल्यानंतर सभिनेनी मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी दमदार शतकी भागीदारी रचली. केट क्रॉसने मंधानाला सिमरन बहादूरकरवी झेलबाद केले. मेघनाने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. १५व्या षटकात स्नेह राणाने मेघनाला झेलबाद करत सुटकेचा निश्वास टाकला, पण रॉड्रिग्सने फटकेबाजी सुरू ठेवली आणि अर्धशतक पूर्ण केले. व्हेलॉसिटीकडून खेळाडूंनी सुमार क्षेत्ररक्षण करत अनेक झेल सोडले. १७व्या षटकात रॉड्रिग्सने खाकाला चुकीचा फटका खेळला आणि ती स्नेह राणाकरवी झेलबाद झाली. रॉड्रिग्सने ७ चौकार आणि एका षटकारासह ६६ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये हेली मॅथ्यूज आणि सोफिया डंकले यांनी फटकेबाजी केली. सिमरन बहादुरने टाकलेल्या २०व्या षटकात या दोघी बाद झाल्या. डंकलेचा राधा यादवने सुंदर झेल घेतला. डंकलेने ७ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १९ धावा केल्या. तर मॅथ्यूजने १५ चेंडूत ४ चौकारांसह २७ धावा केल्या. २० षटकात ट्रेलब्लेझर्सने ४ बाद १९० धावा केल्या.

दोन्ही संघांची Playing 11-

ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधाना (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जेमिमा रॉड्रिग्स, सोफिया डंकले, सभिनेनी मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, सलमा खातून, पूनम यादव, रेणुका सिंग, राजेश्वरी गायकवाड.

व्हेलॉसिटी – शफाली वर्मा, नटकन चँथम, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड, दीप्ती शर्मा (कर्णधार), किरण नवगिरे, स्नेह राणा, राधा यादव, केट क्रॉस, अयाबोंगा खाका, सिमरन बहादूर.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!