Share

Udayanraje Bhosale | “मेलो असतो तर बरं झालं असतं…”, भर सभेत उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर

Published On: 

Udayanraje Bhosale | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत असताना भाजप (BJP) नेते आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना अश्रू अनावर झाले. याबाबत भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. याच परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले.

त्याकाळात शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला. आज सर्व व्यक्तिकेंद्रीत झाले आहेत. कोणीच अपवाद नाही. राष्ट्रीय पक्ष असो की प्रादेशिक पक्ष. असंच चालत राहीलं तर कितपत चालणार. या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.

तसेच, देश परदेशातून लोक येतात तेव्हा त्यांच्या कानावर शिवाजी महाराजांचं नाव पडतं. कशाला पाहिजे, जाऊ द्याना कशाला हवं बेगडी प्रेम. रेल्वे टर्मिनसला तरी का नाव द्यायचं. शिवजयंती तरी करा साजरी करायची?, असे सवाल करत हे बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. त्यांनी तोंडाला रुमाल लावला. कंठ दाटला. मेलो असतो तर बरं झालं असतं. अशा व्यक्तीविरोधात कारवाई करत नसाल तर कुणालाही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!