🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना पदावरुन तातडीने हटवण्याची मागणी होत आहे. अशातच राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी त्यांना स्वतःलाच पद नको असल्याचं सांगितलं आहे अशी चर्चा आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती समोर येतं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक ट्विट केलं आहे.
“राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!,” अशा आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच!
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/MK1rWbhzcA— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2022
प्रकरण नेमकं काय?
मुंबईतून गुजरातींचा पैसा काढून घेतला तर काही उरणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखवल्या गेल्या. यानंतर अनेकांनी राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवरायांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्याशी केल्यानंतर यावेळी महाविकास आघाडी राज्यपालांविरोधात आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारमधील भाजपने यावर तत्काळ भूमिका घेऊन, महाराष्ट्रातून या राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rupali Chakankar | “भारतमाता विधवा की सधवा ठरवणारे तुम्ही कोण?”; रुपाली चाकणकर यांचा संभाजी भिडेंना खोचक सवाल
- Bhagatsingh Koshyari | “मलाच महाराष्ट्राचं राज्यपाल पद नकोय”, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं वक्तव्य
- Jitendra Awhad | “माविआला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक द्यावीच लागेल”; राज्यापालांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक
- Ajit Pawar | “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत म्हणतात की…”, अजित पवारांचा गौप्यस्फोट
- Raj Thackeray | धोतर असा उल्लेख करत राज ठाकरेंचा राज्यपाल कोश्यारींवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
