🕒 1 min read
MNS | मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांची मिमिक्री केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलाच समाचार घेतला.
“राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. तीही ओरिजनल. आम्हाला मुद्रा अभिनय, नाट्याभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरचा पाहू. आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा. इतर अनेक आहेत. आम्ही खरी मिमिक्री पाहू”, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला.
राऊतांच्या या टीकेला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “रोज सकाळी उठून कादर खानप्रमाणे आक्रस्ताळेपणा करणं म्हणजे राजकारण आहे का?,” असा सवाल गजानन काळेंनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. राऊतांच्या या ‘पोपटपंची’ला जनता कंटाळली असल्याचं म्हणत गजानन काळे म्हणालेत.
राजकारण म्हणजे सकाळी उठून रोज आक्रस्ताळपणा करून 'कादर खान'सारखा अभिनय करणे नव्हे ..
आदरणीय बाळासाहेब यांच्या भाषणाला पण काँग्रेसवाले मिमिक्रीच म्हणायचे आज त्यांचीच भाषा काँग्रेस – राष्ट्रवादीचा लाळघोटेपणा करणारे संजय राऊत करत आहेत.
राऊतांच्या या 'पोपटपंची'ला जनता कंटाळली आहे.— Gajanan Kale (@MeGajananKale) November 28, 2022
“राजकारण म्हणजे सकाळी उठून रोज आक्रस्ताळपणा करून ‘कादर खान’सारखा अभिनय करणे नव्हे .. आदरणीय बाळासाहेब यांच्या भाषणाला पण काँग्रेसवाले मिमिक्रीच म्हणायचे आज त्यांचीच भाषा काँग्रेस – राष्ट्रवादीचा लाळघोटेपणा करणारे संजय राऊत करत आहेत. राऊतांच्या या ‘पोपटपंची’ला जनता कंटाळली आहे”, अशा आशयाचं ट्विट गजानन काळे यांनी केलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Bhagatsingh Koshyari | राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाकडून स्पष्टीकरण; म्हणाले,
- Raj Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एकतरी केस आहे का? – राज ठाकरे
- Supriya Sule | “राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी…”, सुप्रिया सुळेंचं विधान
- Sanjay Raut | राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होण्याच्या चर्चेवर संजय राऊत म्हणतात, “राजभवनाची खिंड…”
- Rupali Chakankar | “भारतमाता विधवा की सधवा ठरवणारे तुम्ही कोण?”; रुपाली चाकणकर यांचा संभाजी भिडेंना खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
