Share

Bhagatsingh Koshyari | राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाकडून स्पष्टीकरण; म्हणाले,

Published On: 

🕒 1 min read

Bhagatsingh Koshyari |  मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना पदावरुन तातडीने हटवण्याची मागणी होत आहे. अशातच राज्यपालांनी त्यांना स्वतःलाच पद नको असल्याचं सांगितलं आहे अशी चर्चा आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती समोर येतं आहे.

मात्र राजभवानकडून या वृत्तांबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदमुक्त होण्याबद्दल माध्यमांत सुरु असलेल्या चर्चा अफवा आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त अथवा राजीनामा देण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, असे राजभवनाकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर येतेय. खरंच राज्यपाल पदमुक्त होणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक ट्विट केलं आहे. “राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!,” अशा आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!