मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद अनेकदा पाहायला मिळतात. महाविकास आघाडीतील नेते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात वारंवार शाब्दिक चकमकी सुरु असतात. तसेच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे, यानिमित्त देखील पुन्हा एकदा शाब्दिक वाद पाहायला मिळत आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना शुभेच्छा देताना खोचक शैलीत ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय श्री. भगतसिंग कोशारी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो आणि आपणांस दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा”.
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय श्री. भगतसिंग कोशारी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!@BSKoshyari@maha_governor pic.twitter.com/ubpFkuRvv6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 17, 2022
तसेच काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. “समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज काय असते? समर्थ नसते तर शिवाजी महाराजही नसते.” मात्र, या वक्तव्यातून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे राज्यभर कोश्यारी यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटललेल्या पाहायला मिळाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –


