🕒 1 min read
मुंबई : राज्यात कालपासून पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर सभागृहात प्रश्न उत्तरं सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अन्नधान्यावर लावण्यात आलेल्या जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने कोण कोणत्या गोष्टींवर जीएसटी लावला आहे, याची यादीच त्यांनी वाचून दाखवली.
विधानसभेत ‘महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, २०२२’ या विधेयकावर बोलत असताना जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याबद्दल सरकारवर छगन भुजबळ यांनी टीका केली. भुजबळ म्हणाले कि, “जीएसटी परिषदेने सुचविलेल्या दरवाढीला देशभरात विरोध होत आहे. ही तांत्रिक दरवाढ आहे असे उत्तर सरकारकडून दिले जात असले, तरी आता दरवाढ करणे टाळता आले असते. राज्यातील आणि देशातील जनतेला या महागाईला तोंड द्यायची वेळ आली नसती. छोट्या छोट्या गोष्टींवर जीएसटी लावणे हे अन्यायकारक असून किमान अन्नधान्य, शालेय साहित्य व हॉस्पिटल बिलावर तरी जीएसटी लावण्यात येऊ नये. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असेल तर टॅक्सेस वाढविण्याचे कारणच काय? सगळ्याच गोष्टींवर जीएसटी लावण्यात येत आहे. आता फक्त भाषणांवर जीएसटी लावायचा बाकी आहे.”
पुढे त्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या भावना आणि महागाईमुळे वाढलेल्या समस्या केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या केंद्रीय कमिटीत सहभागी झाले आहेत. मग त्यांनी त्यांचे वजन वापरून सामान्य व्यक्तीचे दुखणे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Ashish shelar | “शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या माईकचा आवाज कुठे रेकॉर्ड होतोय का?”; आशिष शेलारांना संशय
- Neelam Gorhe | “छातीवर हात आपटून बोलू नका”; नीलम गोऱ्हे गुलाबराव पाटलांवर भडकल्या
- Bhaskar Jadhav । मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, भास्कर जाधव संतापले
- Eknath Shinde | सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध – एकनाथ शिंदे
- Assembly Session 2022 | मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, भास्कर जाधव संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
