Share

Ashish shelar | “शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या माईकचा आवाज कुठे रेकॉर्ड होतोय का?”; आशिष शेलारांना संशय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कालपासून पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर सभागृहात प्रश्न उत्तरं सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या समोर २ माईक असल्याचं दिसून आलं. हि गोष्ट भाजप नेते आशिष शेलार यांच्या निदर्शनास आली व त्यांनी यावर संशय व्यक्त केला.

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यासमोर दोन माईक आहेत. अजित पवार यांनीही समोर ठेवण्यात आलेल्या दोन्ही माईकवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या माईकचा आवाज कुठे जात आहे? या तिघांचा आवाज दुसरीकडे कुठे रेकॉर्ड होतोय का? याची चौकशी व्हायलाच हवी.”, असं आशिष शेलार म्हणाले. तर यावर अजित पवार यांनीही त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं. “हो, आमचा आवाज दुसरीकडे जातो. आमचा आवाज थेट दिल्लीला जातो, आमचं पण दिल्लीला ऑफिस आहे.”, असं पवार म्हणाले.

नीलम गोऱ्हे यांनी पाटलांना खडसावलं

सभागृहात एका प्रश्नाचं उत्तर देत असताना मंत्री गुलाबराव पाटील हे जास्तच आक्रमक झाले होते. हा प्रश्न शिक्षण खात्याशी संबंधित होता. तरी देखील गुलाबराव पाटील हे मोठ्या आवाजात उलटप्रश्न करत होते. त्यावरून उपसाभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शांत राहण्याची सूचना केली. तरीही पाटील हे बोलतच होते. त्यावरून गोऱ्हे यांचा संयम सुटला आणि त्यांनी पाटलांना खडे बोल सुनावले. “मंत्री महोदय तुम्ही खाली बसा, हा तुमच्या खात्याशी संबंधित प्रश्न नाही. त्यामुळे उगाच कशाला छातीवर हात आपटून आपटून बोलताय. मला सभागृहाचं कामकाज चालवायचं आहे. हि काय पद्धत झाली का बोलायची? तुम्ही काय कोणत्या चौकात उभे आहात का? परत परत ताकीद देऊनही तुम्ही ऐकत नाही. तुम्ही आधी खाली बसा.” अशा शब्दात गोऱ्हे यांनी पाटलांना खडसावलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!