Share

Asaduddin Owaisi | “मोहन भागवत यांच्यासाठी आजचा दिवस…”; भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसींचा पलटवार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आज विजयादशमी आहे. आजचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. त्याचबरोबर आज नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा नागपूरमध्ये सोहळा पार पडला. त्यावेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृशक्तीचा गौरव केला. पुरुष श्रेष्ठ की महिला हा वाद आम्ही करत नाही. महिलांना घरात ठेवणं योग्य नाही. समाजात दोघांचेही काम परस्परपुरक असल्याचं मोहन भागवत यांनी त्यावेळी ते म्हणाले.

त्याबरोबरच आपल्या देशात लोकसंख्या ही समस्या आहे. मात्र या समस्येचा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा. या लोकसंख्येचा योग्य उपयोग केल्यास देशाला फायदा होऊ शकतो. लोकसंख्या कमी झाल्यास समाजात असमतोल निर्माण होईल. देश संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होत आहे. कोरोनासारख्या आपत्तीकाळातून बाहेर पडून आता आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.

लोकसंख्या धोरणावर मोहन भागवत यांनी बोलल्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत भागवत .यांच्यावर पलटवार केला आहे. मोहन भागवत यांच्यासाठी आजचा दिवस हा द्वेषपूर्ण भाषणातील त्यांचा एक महत्वाचा दिवस असल्याची टीका ओवेसी यांनी केली आहे. देशात लोकसंख्या नियंत्रणाची गरज नसल्याचे सांगत त्यांनी मुस्लिमांच्या प्रजनन दरात आता जलद घट झाल्याचेही सांगितले. जर हिंदू आणि मुस्लिमांचा “डीएनए” समान असेल तर असंतुलन आहे कुठे? असा सवाल त्यांनी ओवेसी यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला.

नेमकं काय म्हणालेत भागवत? 

विजयादशमीनिमित्त बुधवारी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलताना मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच धार्मिक आधारावर लोकसंख्या वाढीतील असंतुलनाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याकडे दुर्लक्षित केले जाऊ नये असंही त्यांनी वक्तव्य केले होते. भारताचे ऐक्य आणि प्रगती सहन न होणाऱ्या शक्ती नवनिर्माणाच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा आहे. या शक्तींना उखडून टाकण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना समाजाने साथ द्यायला हवी,असं सरसंघचालकांनी म्हटलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, जगात आपल्या देशाचं वजन वाढत आहे. अर्थव्यवस्था, क्रीडा क्षेत्रात भारत लक्षणीय कामगिरी करत असल्याचे यावेळी सरसंघचालक यांनी म्हटले आहे. समाजात मातृभाषा कमी प्रमाणात बोलली जात आहे. भाषेचं जतन करणे आवश्यक आहे. तसेच, या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!