Share

Dasara Melava | शिंदे गटाच्या मेळाव्यापूर्वी अब्दूल सत्तार यांची प्रतिक्रिया! म्हणाले, “हिंदुत्वाची भूमिका…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे हे दादरच्या शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वांद्रे येथील बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या दोन्ही दसरा सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येत आहेत. कोणताही अनुचित प्रकार किंवा हाणामारी होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ एकमेकांवर धडाडणार आहे. दरम्यान शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संदाव साधला.

“लाखोच्या संख्येने कार्यकर्ते बीकेसी मैदानावर येत आहेत. ऐतिहासिक गर्दी एकनाथ शिंदे यांच्या सभेला राहणार आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आशिर्वाद एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. हिंदुत्वाची भूमिका घेऊन ते सर्वांसमोर जात आहेत,” असे अब्दुल सत्तार म्हणाले.

विनायक राऊत यांची शिंदे गटावर टीका-

दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. “पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच सोन लुटलं जायच आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार आमच्यासाठी मौलिक आहेत. आम्ही खरे बाळासाहेबांचे निष्ठावाण हे सांगण्यासाठी शिंदे गटाचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. पण आज बाळासाहेब असते तर यांच्या ढुंगणावर लाथ मारुन मिठी नदीमध्ये यांचे विसर्जण केले असते. बाळासाहेबांचे स्थान हे ह्रदयात असले पाहीजे, बाळासाहेबांचे विचार हे डोक्यात असले पाहिजे आणि बाळासाहेबांवरची श्रद्धा खऱ्या अर्थाने संपूर्ण शरीरात भिनलेली पाहीजे. त्यामुळे अशा बाजारु लोकांना बाळासाहेब कळणार नाहीत,” असे विनायक राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित करतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर संबोधित करतील. या दोन्ही मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा ५ दशकांपासून सुरू आहे. मात्र या वर्षी दोन मेळावे होत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!