Sambhaji Brigade | मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराजांबद्दल वक्तव्य केलं होतं. तर आज शिवप्रतापदिनी भाजप (BJP) नेते मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी देखील केलेल्या विधनाने खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.
यावेळी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी भाजप यांच्यासह एकनाथ शिंदे गटाला देखील इशारा दिला आहे. मिंधे गटाच्या शिंदेसोबत शिवाजी महाराजांची तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा अवमान आहे, असं आखरे म्हणाले आहेत.
तसेच, याद राखा, शिवाजी महाराजांची तुलना फितुरांसोबत करणार असाल तर ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे, असं देखील ते म्हणाले. मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केल्यामुळे संभाजी ब्रिगेड संघटनेनं भाजपला देखील इशारा दिला आहे.
दरम्यान, इथून पुढे भापज, आरएसएस किंवा कोणीही शिवाजी महाराजांचा अपमान करेल तर गुद्द्या म्हणजे बुक्क्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chhagan Bhujbal | “शिवरायांचा इतिहास माहीत नसेल तर…”, छगन भुजबळ लोढांवर संतापले
- Nawab Malik | नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; ईडीच्या विशेष न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला
- Chandrasekhar Bawankule | “राज्यपालांची चूक झाली, पण…” ; चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
- Nagnath Kotapalle | ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
- Sanjay Raut | “राज्यपाल अजूनही राजभवनात कसे?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल


