Share

Pankaja Munde | आता विषय संपला, तुम्ही कुणीही पदाची अपेक्षा करायची नाही – पंकजा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप, टोलेबाजी करण्याची चढाओढ लागली असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप (BJP) पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांनी दसरा मेळाव्याव्यात एक वक्तव्य केलं आहे.

आता विषय संपला, आपण आपलं काम करुया. तुम्ही कुणीही पदाची अपेक्षा करायची नाही. माध्यमांनीही चर्चा करायची नाही असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. “जरुरत से जादा इमानदार हू मैं, इसलिए सबके नजरों में गुनहगार हु”. मला आता पक्षाला त्रास द्यायचा नाही. कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचं नाही. आपण आपलं शांत राहायचं. मी दुर्गेचं रुप धारण करावं असं तुम्हाला वाटतं, ते मी करेन असं पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्हीपैकी कोणत्या दसऱ्या मेळाव्यातील भाषण ऐकण्याची उत्सुकता आहे?, असा सवाल पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, मुंबईत आज दोन मेळावे होणार आहेत. हे मेळावे प्रचंड ताकदीने होत आहेत. सर्वांचे लक्ष या मेळाव्याकडे आहे. सर्व माध्यमांचं लक्ष या मेळाव्याकडे आहे. म्हणून मी दोघांनाही शुभेच्छा देते. आज पंकजा मुंडे यांचा भागवान गडावर दसरा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेनेतील सर्व गोष्टींकडे मी कुतुहलाने बघते. कारण मी या गोष्टीतून गेले आहे. मी एका मेळाव्याचं सीमोल्लंघन करून दुसऱ्या मेळाव्याचं स्थान निर्माण केलं आहे. तुम्ही सावकरगावचं आमचं भगवान बाबांचं मंदिर बघितलं पाहिजे. आम्ही अत्यंत सुंदर आणि देखणं मंदिर उभं केलं आहे. तसंच मी या दोघांकडे कुतुहलाने बघते. आज त्यांच्यासाठी सिमोल्लंघनाचा खरा दिवस आहे. ते विषयांचं आणि जनतेच्या प्रश्नांचं सीमोल्लंघन करतील अशी अपेक्षा असल्याचं त्या म्हणाल्या.

मुंबई मेळाव्यातील शान शौकतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा :

पंकजा यांनी आपल्या मनातील सर्वसामान्य लोकांची भावना व्यक्त करताना मुंबई मेळाव्यातील शान शौकतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असल्याचं म्हटलं जात आहे. आमचा मेळावा डोंगरांमध्ये होतो, डोक्यावर ऊन असतं तरीही लोकांचा उल्हास असतो, असा माझा मेळावा असतो, माझा मेळावा हा पक्षाचा नसून वंचितांचा असतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!