🕒 1 min read
मुंबई : शिवसेना पक्षात फुट पडल्यामुळे आज मुंबईत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन मेळावे होणार आहेत. यामध्ये कोणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला दुपार पासूनच शिवसैनिक जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शिवतीर्थावर लांबून लोक स्वतःच्या खर्चाने पोहचले असून आपल्यासोबत भाकरी देखील घेऊन आले आहेत. एवढंच नाही उद्धव ठाकरे हेच आम्हा शेतकऱ्यांचे खरे नेते असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघालेले आहेत. अशातच एक दुःखद बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी जात असताना एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालूक्यातील अडसुळ गावचे श्रीकृष्ण मांजरे, असे या कार्यकर्त्याचं नावं आहे. ते यवतमाळहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी ते मुंबईकडे निघाले होते. भिवंडी जवळ शिवशक्ती लॅानजवळ कार्यकर्त्यांची नास्ता करण्याची सोय करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान ,या दोन्ही दसरा सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येत आहेत. कोणताही अनुचित प्रकार किंवा हाणामारी होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एकाच पक्षाचे दोन दसरा मेळावे होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ एकमेकांवर धडाडणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Dasara Melava | “अगोदर पेपर फोडणार नाही पण…”; शिंदे गटाचे दसरा मेळाव्याबाबत मोठं विधान
- Ajit Pawar । आधी कुणाची सभा ऐकणार?, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?, अजित पवारांनी उघडपणे सांगितलं…
- Pankaja Munde | ज्या पक्षात कुणीच जात नव्हतं त्या पक्षात गोपीनाथ मुंडे गेले – पंकजा मुंडे
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिकांची उत्सुक्ता, दुपार पासूनच शिवसैनिक जमा होण्यास सुरुवात
- Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात भाषणानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा ; पोलिसांचा लाठीचार्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
