Share

Shivsena | महिला शिवसैनिकांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना भर रसत्यात चोपलं, नाशिक – मुंबई महामार्गावरील घटना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच महिला शिवसैनिकांनी भर रसत्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप दिला असल्याचं समोर आलं आहे.

शिवसेना महिलांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोपलं :

नाशिक मुंबई महामार्गावरून जेव्हा शिवसेना पक्षातील महिलांची बस जात होती. त्याचवेळी बाजूने जात असलेल्या वाहनांमधील पुरुष प्रवाशांनी महिलांकडे बघून काही चित्र विचित्र हातवारे केले असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महिलांनी गाडी थांबवत वाहनातील हातवारे करणाऱ्यांना बाहेर काढत जोरदार चोप दिला आहे. मात्र काही वेळातच काही रस्त्याने जाणाऱ्यानी महिलांना थांबवत वाद मिटवण्यास सांगितले. काही वेळातच महिला पुढील दिशेने मुंबईकडे रवाना झाले. मात्र दोन्ही वाहने कोणत्या जिल्ह्यातून आली आहेत, हे मात्र अद्याप समोर आलेलं आहे.

दरम्यान, हायकोर्टाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागल्यामुळे शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरेंचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असून शिवसैनिक दुपार पासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शिवतीर्थावर पोस्टर लावण्यात आलं असलं तरी कोणत्या प्रकारच्या खुर्च्या लावण्यात आलेल्या नाहीयेत.

शिवतीर्थावर लांबून लोक स्वतःच्या खर्चाने पोहचले असून आपल्यासोबत भाकरी देखील घेऊन आले आहेत. एवढंच नाही उद्धव ठाकरे हेच आम्हा शेतकऱ्यांचे खरे नेते असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!