Share

RSS | विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांकडून मातृशक्तीचा गौरव

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : आज विजयादशमी आहे. आजचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. त्याचबरोबर आज नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा नागपूरमध्ये सोहळा पार पडला. त्यावेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृशक्तीचा गौरव केला. पुरुष श्रेष्ठ की महिला हा वाद आम्ही करत नाही. महिलांना घरात ठेवणं योग्य नाही. समाजात दोघांचेही काम परस्परपुरक असल्याचं मोहन भागवत यांनी त्यावेळी ते म्हणाले.

संघाचा कार्यक्रम रेशीमबाग मैदानावर झाला. सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून संतोष यादव या महिलेला स्थान देण्यात आले. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून शस्त्रपूजन करण्यात आले. ते झाल्यानंतर त्यांनी स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचे सरसंघचालकांनी निरीक्षणही केले असल्याचं समजतं आहे. भाषण करताना सरसंघचालक म्हणाले की, जगात आपल्या देशाचं वजन वाढत आहे. अर्थव्यवस्था, क्रीडा क्षेत्रात भारत लक्षणीय कामगिरी करत असल्याचे यावेळी सरसंघचालक यांनी म्हटले आहे. समाजात मातृभाषा कमी प्रमाणात बोलली जात आहे. भाषेचं जतन करणे आवश्यक आहे.

आपल्य देशात लोकसंख्या ही समस्या आहे. मात्र या समस्येचा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा. या लोकसंख्येचा योग्य उपयोग केल्यास देशाला फायदा होऊ शकतो. लोकसंख्या कमी झाल्यास समाजात असमतोल निर्माण होईल. देश संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होत आहे. कोरोनासारख्या आपत्तीकाळातून बाहेर पडून आता आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. भारताचे ऐक्य आणि प्रगती सहन न होणाऱ्या शक्ती नवनिर्माणाच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा आहे. या शक्तींना उखडून टाकण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना समाजाने साथ द्यायला हवी,असं सरसंघचालकांनी म्हटलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, जगात आपल्या देशाचं वजन वाढत आहे. अर्थव्यवस्था, क्रीडा क्षेत्रात भारत लक्षणीय कामगिरी करत असल्याचे यावेळी सरसंघचालक यांनी म्हटले आहे. समाजात मातृभाषा कमी प्रमाणात बोलली जात आहे. भाषेचं जतन करणे आवश्यक आहे. तसेच, या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!