Share

Vikram Gokhale | दिग्गज अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

Published On: 

🕒 1 min read

पुणे: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) गेल्या पंधरा दिवसापासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ही मिळत होती. अशा परिस्थितीत बुधवार संध्याकाळपासून दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. पण नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आपले अखेरचे श्वास मोजले.

विक्रम गोखले हे बुधवारी दुपारपासून कोमात गेले होते तेव्हापासून त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद देणे बंद केले होते. दरम्यान त्यांना हृदय आणि किडनीशी निगडित समस्या जाणवत होती. त्याचबरोबर त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम गोखले यांच्या सर्व अवयवांनी काम करणे बंद केले होते.

विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात चार वाजता ठेवण्यात येणार आहे. सहा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अभिनेते विक्रम गोखले हे नाव डोळ्यासमोर येताच त्यांनी केलेले बॉलीवूडमधील अगणित पात्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांनी संजय लीला भन्सालीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटामध्ये ऐश्वर्या रायच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्यांनी बॉलीवूडमधील सुपरहिट भुलभुलय्या, दिल से, दे दनादन, हिचकी, मिशन मंगल यासारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला होता. विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटांमध्ये ही भरपूर काम केले आहेत.

विक्रम गोखले हे नाव हिंदी चित्रपट सृष्टीसह मराठी रंगभूमीवरही चांगलेच गाजलेले आहे. विक्रम गोखले यांच्याकडे अभिनयाचा पारिवारिक वारसा होता. कारण त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावरील पहिल्या महिला अभिनेत्री होत्या असे म्हटले जाते. त्याचबरोबर त्यांची आजी कमलाबाई गोखले देखील भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिली महिला बाल कामगार म्हणून ओळखल्या जातात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!