Share

TNPL 2022 : मुरली विजय करतोय कमबॅक! म्हणाला, “मला शक्य तितके..”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिग्गज फलंदाज मुरली विजय प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. मुरली विजय तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL 2022) मध्ये भाग घेणार आहे. तब्बल दोन वर्षांनी तो पुनरागमन करत आहे. २० षटकांच्या क्रिकेटमध्ये मुरली विजयने आयपीएलमधील शेवटचा सामना खेळला होता. त्याने २०२०च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जसाठी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला आणि त्यानंतर कोणत्याही टी-२० सामन्यात त्याने भाग घेतला नाही.

ईएसपीएन क्रिकइन्फोशी संभाषणादरम्यान, मुरली विजय म्हणाला, “मला शक्य तितके दिवस खेळायचे आहे. मी केवळ वैयक्तिक कारणांसाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. माझे कुटुंब नवीन आहे आणि मला त्यांची काळजी घ्यायची होती. मी सध्या माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि आता मला फिट वाटत आहे. मी टीएनपीएल आणि माझ्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. मला खेळायचे होते पण दुखापती आणि वैयक्तिक कारणांमुळे मैदानापासून दूर राहावे लागले. मला हा ब्रेक हवा होता. टीएनसीएने माझा मुद्दा समजून घेतला आणि मला परत येण्याची संधी दिली. मला माझ्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे.”

मुरली विजयने भारतीय संघाकडून शेवटचा सामना २००८ मध्ये पर्थ कसोटीच्या रुपात खेळला. त्यानंतर त्याने तामिळनाडूसाठी २०१९च्या रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेतला. आता पुन्हा एकदा तो बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. त्याचे पुनरागमन कसे होणार आणि त्याची कामगिरी कशी होते हे पाहणे बाकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!