Share

Bhaskar Jadhav : ‘नॉट रिचेबल’ असणारे भास्कर जाधव चिपळूणमध्येच; सेनेत राहण्याच्या निर्णयावर ठाम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना आमदार भास्कर जाधव आज सकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत होती मात्र आता ते चिपळूणमध्ये दाखल झाले असून आपण शिवसेनेतच राहण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती निरर्थक ठरली आहे.

दरम्यान सेनेशी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ४९ आमदारांचे पाठबळ आहे तर शिवसेनेकडे १५ मात्र भास्कर जाधव नॉट रिचेबल असल्यामुळे ही संख्या कमी होण्याच्या मार्गावर होती. आता जाधव चिपळूणमध्येच असल्याने या संखेत काही बदल होणार नाही. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर परिणाम होत आहे. मविआ सरकार डगमगीत होताना दिसून येत आहे.

काल (२३ जून) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले कि, “राज्याचे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू. सरकार टिकण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. मी दुपारी मुख्यमंत्र्यांशी बोललो, आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!