Share

ENG vs IND : टीम इंडियासोबत विराट कोहलीसाठी खुशखबर; इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू पडला मालिकेबाहेर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्याची (ENG vs IND) सुरुवात १ जुलै रोजी होणार्‍या एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. या पुनर्निर्धारित सामन्यानंतर, टीम इंडियाला यजमानांविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंग्लिश संघाचा स्टार फिरकी गोलंदाज आदिल रशीद भारताविरुद्ध टी-२० किंवा एकदिवसीय मालिका खेळणार नाही. त्याने ईसीबीकडे हज यात्रेसाठी रजा मागितली होती, ज्याची त्याला परवानगी मिळाली आहे.

रशीद शनिवारी हजला जाणार असून ते जुलैच्या मध्यापर्यंतच मायदेशी परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत तो भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकणार आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हा खेळाडू संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. रशीदला संघाबाहेर केल्याने विराट कोहलीने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. रशीदविरुद्ध मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये कोहलीचा रेकॉर्ड चांगला राहिला नाही.

राशिदने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ डावात कोहलीला तीन वेळा बाद केले आहे, तर टी-२० क्रिकेटमध्ये ८ डावात दोनदा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेची सुरुवात ७ जुलै रोजी होणार्‍या पहिल्या टी-२० सामन्याने होणार आहे. यानंतर ९ आणि १० जुलै रोजी पुढील दोन सामने होतील. पहिला एकदिवसीय सामना १२ जुलै रोजी होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील इतर दोन सामने १४ आणि १७ जुलै रोजी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!