Share

Sanjay Raut : “सरकार टिकेल किंवा जाईल पण शरद पवार यांच्याबाबत…”, ‘त्या’ धमकीनंतर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेला गळतीचे जणू ग्रहणच लागल्याचे दिसून येत आहे. आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रतिक्रिया देत टीका केली होती तसेच शरद पवारांना गंभीर इशाराही दिला होता. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही.रस्त्यात अडवू अशी धमकी भाजपचे एक केंद्रीय मंत्री देतात. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. हे ट्वीट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

“सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत. ते व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे. तसेच शरद पवार बंडखोर आमदारांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” असा इशारा नारायण राणे यांनी शरद पवारांना दिला आहे.

तसेच “आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही”, असा टोला देखील नारायण राणे यांनी शरद पवारांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!