Share

ENG vs NZ : तिसऱ्या कसोटीत विचित्र पद्धतीनं आऊट झाला न्यूझीलंडचा फलंदाज; पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक अनोखी घटना पाहायला मिळाली. किवी फलंदाज हेन्री निकोल्स अशा पद्धतीने आऊट झाला की पाहून सगळेच थक्क झाले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या ट्विटर हँडलवर निकोलसच्या विकेटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून कोणीही कपाळाला हात लावू शकतो.

खरं तर, इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीचच्या चेंडूवर निकोल्सने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्याने सरळ बॅटने शॉट खेळला आणि चेंडू थेट नॉन-स्ट्रायकर डॅरिल मिशेलच्या बॅटवर गेला. बॅटला आदळल्यानंतर चेंडूचा मार्ग बदलला आणि मिडऑफला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे गेला. क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला, पण कोणालाही काही समजले नाही. नंतर असे दिसून आले की मिशेलच्या बॅटला लागण्यापूर्वी चेंडू हवेत होता आणि क्षेत्ररक्षकाने झेल घेतला. अशा प्रकारे निकोलस पॅव्हेलियनमध्ये परतला.

तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकातच त्यांनी एक विकेट गमावली. केन विल्यमसन चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण तोही ३१ धावा करून बाद झाला. एकूण १२३ धावांवर निकोलसची विकेट पडली आणि त्याच्या संघासाठी हा पाचवा धक्का होता.

पहिल्या दोन सामन्यात किवींना अडचणीतून बाहेर काढणाऱ्या डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेल यांनी यावेळीही त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. या दोघांनी आतापर्यंत सहाव्या विकेटसाठी १०२ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. मिचेलने ७८ धावा केल्या, तर ब्लंडेलने ४५ धावा केल्या. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच यांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!