Share

“द्रविडच्या ‘त्या’ निर्णयानंतर मला पहिल्यांदा निवृत्ती घ्यावीशी वाटली”, मिताली राजचा खुलासा!

Published On: 

मुंबई : भारताची दिग्गज महिला क्रिकेटर मिताली राज नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली. तिच्या २३ वर्षाच्या शानदार कारकिर्दीत अनेक चढउतार आले. याआधीही मितालीने निवृत्तीचा विचार केला होता. २०२२च्या विश्वचषकानंतरच मिताली क्रिकेटला अलविदा करण्याच्या विचारात होती, परंतु कधीही घाईत मोठे निर्णय न घेणाऱ्या मितालीने काही काळ वाट पाहिली.

पीटीआयशी विशेष संवाद साधताना, तिने आपली कारकीर्द, बीसीसीआयच्या आधी आणि नंतर खेळण्याचा अनुभव, गेल्या पाच वर्षांत संघाचे सातत्यपूर्ण अपयश २०२२च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान ड्रेसिंग रूममधील मतभेद याबद्दल मोकळेपणाने मत दिले. निवृत्तीच्या घोषणेवर ती म्हणाला, ”राहुल द्रविडने (२०१२) क्रिकेटला अलविदा केल्यावर पहिल्यांदाच माझ्या मनात निवृत्तीचा विचार आला. मी पत्रकार परिषद पाहिली जी खूप भावनिक होती आणि मला वाटले की मी निवृत्त झाल्यास कसे वाटेल?”

मिताली म्हणाली, ”मला वाटायचे की असा भावनिक क्षण नसेल. मला माहीत होते, की विश्वचषक हा माझा शेवटचा असेल, पण मी भावनेच्या चढउतारात निर्णय घेत नाही, मग देशांतर्गत क्रिकेट खेळताना मला वाटले, की आता ती आवड राहिली नाही आणि मी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला.”

“महिला क्रिकेट बीसीसीआयच्या छत्राखाली आले, व्यावसायिकता, स्थैर्य, सुरक्षा आणि प्रगती आली. आता खेळ होताच प्रत्येकजण पंचतारांकित हॉटेलच्या खोल्यांमध्ये जातो. बहुतेक मुली फोनवर असतात. ते चुकीचे आहे असे मी म्हणत नाही पण काळ बदलला आहे”, असे मितालीने सांगितले. विश्वचषकादरम्यान संघातील मतभेदांबाबत ती म्हणाली, “सांघिक खेळात मतभेद असतात आणि ते स्वाभाविक आहे. प्रत्येकाला चांगले खेळायचे असते पण प्रत्येकाचे मत वेगळे असते.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!