Share

नागपूरच्या पाणी समस्येवर गडकरींचा फडणवीसांना घरचा आहेर ; भाजपची कोंडी!

Published On: 

🕒 1 min read

नागपूर :  पेंच आणि कन्हान या नद्यांमधून आवश्यक तेवढे पाणी मिळत आहे, असे असले तरी मागील १० वर्षांपासून संपूर्ण शहराला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणी वितरणाचे काम शहरात असमाधानकारक आहे. शहरातील अनेक ठिकाणी जलवाहिन्यांची कामे अर्धवट आणि अपूर्ण आहेत. शहराच्या एकाही भागात चोवीस तास पाणी मिळत नाही” असे मत नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नागपूर शहराच्या पाणी प्रश्नावरील आढावा बैठकीत ते त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. एकप्रकारे नितीन गडकरी यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाच घराचा आहेर दिला आहे.

एकीकडे राज्यभरात भाजपच्या वतीने राज्य सरकार विरोधात जलाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येते आहे. मात्र राज्यात पाण्याच्या समस्येवर नियमितपणे जलआक्रोश करणारे भाजप नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील पाणी टंचाईची समस्या यावर त्यांच्याच पक्षाच्या बड्या नेत्याने बोट उचलल्याने आता यावर चर्चा होत आहे. गडकरींनी नागपूरकरांच्या पाणी प्रश्नाला वाचा फोडली आहे.

भाजपच्या वतीने पहिल्यांदा जलआक्रोश औरंगाबाद व त्यानंतर जालन्यात पाणी प्रश्नावर मोर्चा काढला. मात्र नागपुरातही तीव्र पाणी टंचाई आहे आणि ती भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी बोलून दाखवली. पण फडणवीस आता यावर जलआक्रोश मोर्चा काढतील का ? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!