🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेता जॉनी लीवरची मुलगी जेमी लीवर देखील तिच्या वडिलांप्रमाणेच उत्तम कॉमेडी करत असते. ती तिचे कॉमेडी व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या कॉमेडी व्हिडिओंना भरभरून प्रेम देत असतात. जेमी लीवर अनेक कलाकारांची कॉपी देखील करत असते. आता जेमी लीवरने राखी सावंत संबंधित एक मजेशीर व्हिडिओ केला आहे. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जेमीने तिच्या इंस्टाग्रामवरून स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत राखी सावंतही दिसत आहे. जेमी लीवर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती अनेकदा तिचे खास व्हिडिओ शेअर करत असते.
https://www.instagram.com/p/Cex3PS1oVWs/
व्हिडिओमध्ये जेमी राखी सावंतची एक्टिंग करताना म्हणते, ‘हॅलो फ्रेंड, मी राखी आहे आणि मी आज जिममध्ये आले आहे. आणि मी हार्डकोर वर्क आऊटिंग करेन. आणि वजन कमी करून सर्वांना दाखवीन. यानंतर राखी सावंत मागून जेमी लीवरकडे येते आणि म्हणते, हॅलो डुप्लिकेट. दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
