🕒 1 min read
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या सुंदर चेहऱ्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा आगामी चित्रपट पर्वम हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी साई पल्लवीने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. बॉलीवूड चित्रपट द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने हा नवीन वाद सुरु झाला आहे.
साई पल्लवी म्हणाली, ”द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
"The film #KashmirFiles shows how #KashmiriPandits were killed. Recently, there was an incident of a person being killed carrying cow because he was suspected to be a #Muslim. After killing the person, the attackers raised #JaiShriRam slogans." : #SaiPallavi #VirataParvam pic.twitter.com/mLfRJ32ynj
— Hate Detector ???? (@HateDetectors) June 14, 2022
तिच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर होणाऱ्या टिकेला सामोरे जावे लागत आहे. यावर अनेक सोशल मीडिया युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान एका ट्विटर युजरने ट्विट करून म्हटले की, तुम्ही बोलला ते खूप चुकीचे आहे. तर दुसर्या युजरने म्हटले आहे की, ‘मला साई पल्लवीची स्टाइल आवडली. सोशल मीडियावरून अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
