🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी आता पुन्हा जोर धरु लागली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता सरकारला थेट ९ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मराठा आरक्षणाशिवाय निवडणुकांचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू असाही इशारा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.
सोमवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच, मराठा आरक्षणाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासंदर्भात फक्त घोषणा होत असतात, पण वस्तुस्थितीत रूपांतर होत नाही. सगळ्यांना आशा आहे की, शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल. कुठल्याही समाजाच्या लोकांवर अन्याय न होता, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :
- Weight Loss Drinks | वजन कमी करायचं आहे, पण होत नाही? मग ‘ही’ पेय नक्की ट्राय करा
- Eknath shinde and Devendra Fadanvis | मंत्रिपदासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रस्सीखेच! बंड थंड होईल का?
- Maharashtra Cabinet Expansion । गृह आणि अर्थ खाती फडणवीसांकडेच?, शिंदे सरकारमध्ये वर्चस्व भाजपचंच राहणार…
- Yashomati Thakur | वाढत्या अत्याचाराला सर्वस्वी शिंदे सरकार जबाबदार – यशोमती ठाकूर
- Uddhav Thackeray | “भगव्याला हात लावायचा प्रयत्न केला तर…” ; उद्धव ठाकरे यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
