Share

Eknath shinde and Devendra Fadanvis | मंत्रिपदासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रस्सीखेच! बंड थंड होईल का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली आहे. यासोबतच मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी विशेष अट घालण्यात आली आहे. त्यानुसार स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांनाच मंत्रीपद दिले जाणार आहे. यानंतर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावावर कात्री चालवल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्यात सत्तार यांच्या मुलींचे नाव समोर आले आहे. अशा स्थितीत सत्तार यांचा सरकारमध्ये समावेश होण्याची शक्यता फारच कमी आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी देण्याचे शिंदे आणि फडणवीस यांनी मान्य केले आहे. त्यामुळे सत्तार यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुली हिना आणि उज्मा यांचा समावेश आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला फारसे महत्त्वाचे खाते दिले जात नसल्याची बातमी आहे.

दोन ते तीन जणांची नावे कापली जाऊ शकतात-

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडे अर्थ, गृह आणि महसूल ही महत्त्वाची खाती असतील. यातून महसूल मंत्रालय मिळावे यासाठी शिंदे आग्रही आहेत. शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात नऊ माजी मंदोन ते तीन जणांची नावे कापली जाऊ शकतात,त्र्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारच्या नऊ मंत्र्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला होता. या सर्वांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळावे, अशी शिंदे यांची इच्छा होती. मात्र यातील दोन ते तीन जणांची नावे कापली जाऊ शकतात, असे मानले जात आहे.

पहिल्या टप्प्यात 15 ते 18 मंत्री शपथ घेऊ शकतात –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी ठाण्यातील नंदनवन येथील एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर भेट दिली. याबाबत दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निश्चित करण्यावर चर्चा झाल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात 15 ते 18 मंत्री शपथ घेऊ शकतात. यामध्ये भाजपचे 11 ते 12 तर शिंदे गटातील 5 ते 7 आमदारांना संधी मिळू शकते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होऊन दीड महिना उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका होत आहे. संबंधित विभागाचे मंत्री व मंत्र्यांची नियुक्ती न झाल्याने सर्व कामेही रखडली आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!