🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : अयोग्य आणि अनियमित वेळेवर आहार आणि बैठी जीवनशैली यामुळे लठ्ठपणाची समस्या सर्वच वयोगटातील लोकांना जाणवत आहे. तासंतास डेस्कवर बसून काम करणे, बाहेरचे खाणे, अपूर्ण झोप आणि मानसिक ताण या सगळ्यामुळेच लठ्ठपणा वाढत आहे. त्यातच व्यस्थ जीवनशैलीमुळे जिम किंवा व्यायाम करायला वेळ मिळत नाही. त्यामुळेच इच्छा असूनही कित्येक लोक आपले वजन कमी करू शकत नाहीत. त्यामुळेच शरीरात मधुमेह, रक्तदाब आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही खास ड्रिंक्स (पेय) सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहायला मदत होईल.
कोमट पाणी आणि मध
साखरेला पर्याय म्हणून मध योग्य आहे. ज्या ड्रिंक्स, ज्यूसमध्ये साखर घालावी लागते त्यात तुम्ही मध घालू शकता. मात्र लक्षात ठेवा, मध कधीही गरम करू नका आणि फ्रिजमधेही ठेवू नका. त्याचबरोबर रोज सकाळी रिकाम्या पोटी मधाचे सेवन केल्याने वजन नियंत्रित करता येते. सर्वप्रथम १ ग्लास कोमट पाण्यात १ चमचे मध मिसळा आणि त्यात अर्धा लिंबू पिळून त्याचे सेवन करा. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले मध भूक नियंत्रित करते आणि वजन कमी करते.
ब्लूबेरी आणि ओटमील शेक
वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ओटमील आणि ब्लूबेरी शेक हे फायदेशीर ठरू शकतात. यामुळे पोट दिवसभर भरलेले राहते. हे शेक बनवण्यासाठी एका ग्लास दुधात 2 चमचे ओटचे जाडे भरडे पीठ, अर्धा कप ब्लूबेरी घाला आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवा. यानंतर त्यात मध आणि चियाच्या बिया घालून प्या.
आवळा रस
आवळ्याचा रस वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. आवळा रस पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवते. याचे सेवन केल्याने शरीरात चरबी कमी होते. आवळ्याचा रस प्यायल्यानंतर पोट बराच वेळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते. वजन कमी करण्यासोबतच आवळ्याचा रस शरीराला अनेक आजारांपासून वाचवतो, कारण आवळ्यात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे तुमचे केस आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते.
कोरफडीचा रस
अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त कोरफडीचा रस वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामध्ये असलेले घटक पचनक्रिया सुधारतात आणि लठ्ठपणा नियंत्रित करतात. सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस घेतल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करता येते. हा रस तसेच सर्दी खोकला यांसारख्या आजारांवर देखील उपयुक्त आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath shinde and Devendra Fadanvis | मंत्रिपदासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रस्सीखेच! बंड थंड होईल का?
- Maharashtra Cabinet Expansion । गृह आणि अर्थ खाती फडणवीसांकडेच?, शिंदे सरकारमध्ये वर्चस्व भाजपचंच राहणार…
- Yashomati Thakur | वाढत्या अत्याचाराला सर्वस्वी शिंदे सरकार जबाबदार – यशोमती ठाकूर
- Uddhav Thackeray | “भगव्याला हात लावायचा प्रयत्न केला तर…” ; उद्धव ठाकरे यांचा इशारा
- Masoon Sawal poster conflict | पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर भगवान कृष्णाचा फोटो असल्याने चित्रपट निर्मात्यांविरोधात तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
