🕒 1 min read
सोलापूर : वसंतदादा शुगर इन्स्टियूटच्या साखर परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साखरेचा विषय आल्यावर मी उजव्या आणि डाव्या बाजूला पाहतो, त्या ठिकाणी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात बसलेले असतात, असे सांगितले होते. त्यावरून आज राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते सोलापूर येथे बोलत होते.
“तुम्ही मुख्यमंत्री होऊन अडीच वर्षे झाले आहेत. अजूनही तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेच बघत आहात. ते दोघेही साखर कारखानदार आहेत, त्यांना पाहिजे तसेच ते धोरण राबवणार. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले आहे, अजित पवार आणि थोरातांना नाही, याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवावी,” असे राजू शेट्टी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
