नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? हा प्रश्न भेट झाल्यापासून सर्वांना पडला होता. यासंदर्भात महाष्ट्रातही यावर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. राज्यातल्या ईडीच्या कारवाईबाबतही तसेच ही भेट 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. आता या भेटीत काय झालं याचा सस्पेन्स संपला आहे. 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, मागच्या दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे. याबाबद पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले. यावर राज्यपालांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे हा विषय मोदींच्या कानावर घातला. या विषयावर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे.
तसेच “राष्ट्रवादी-सेना भाजपविरोधात एकत्र उभी आहे. इतरांच्या सांगण्यावरुन भाजपसोबत राष्ट्रवादी मुळीच जाणार नाही. मविआ सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करणार. मविआ सरकारला कोणताही धोका नाही, पुन्हा सत्तेत येऊ, असे म्हणत पवारांनी राज्यातल्या भाजप नेत्यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले”.
महत्वाच्या बातम्या –


