Share

IPL 2022 : मॅचही गेली अन् २ कोटीचा खेळाडूही; राजस्थान रॉयल्सचा बसला ४४० वोल्टचा धक्का!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये चांगल्या फॉर्मात खेळमाऱ्या राजस्थान रॉयल्सला बुधवारी मोठा धक्का बसला. संघाचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईल आता आयपीएल २०२२च्या उर्वरित हंगामातून बाहेर आहे. या मोसमात तो फक्त एकच सामना खेळला. सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या हंगामातील संघाच्या सलामीच्या सामन्यात तो दिसला. यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला.

राजस्थान रॉयल्स संघाने त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली. २९ मार्च रोजी पुण्यात झालेल्या सामन्यात ३४ वर्षीय नॅथन कुल्टर-नाईलने हैदराबादविरुद्ध तीन षटके टाकली आणि ४८ धावा दिल्या. त्यालाही यश मिळू शकले नाही. संघाच्या पुढील दोन सामन्यातही तो खेळू शकला नाही आणि आता दुखापतीमुळे त्याला मोसमातून बाहेर राहावे लागले आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल्स संघाने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत तीन पैकी दोन सामने जिंकून चांगली सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ६१ धावांनी पराभव केला, त्यानंतर पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सवर २३ धावांनी विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या सामन्यात राजस्थानचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ४ विकेट्सने पराभव झाला.

राजस्थान रॉयल्सने नॅथन कुल्टर-नाईलला मेगा ऑक्शनमध्ये २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत संघात घेतले होते. फ्रेंचायझीने अद्याप कोणत्याही बदलीची घोषणा केलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!