शिर्डी : काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या आघाडीवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत अजित पवारांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. इतक्या दिवस झोपा काढल्या का? असा थेट सवाल अजित पवारांनी केला आहे.
“काही लोक समाजात फूट पाडण्याचे काम करतात. मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, धर्मावरील राजकारण फार काळ टिकत नाही” असे बोलत शरद पवार यांनी जोरदार टीका केली.
आज अजित पवार शिर्डी दौऱ्यावर गेले आहेत, यावेळी अजित पवार यांनी विविध विकास कामांची घोषणा देखील केल्याचे पहायला मिळाले. कोपरगाव ग्रामिण पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीसाठी चार कोटी रुपये देण्याची घोषणा देखील अजित पवार यांनी केली आहे. तसेच कोपर गाव शहरातील भूमिगत गटारीचा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावला जाईल असे अश्वासनही दिले.
महत्वाच्या बातम्या –
“हा येड ** आहे, अशा *** स्थान नाही” – राऊतांची पुन्हा सोमय्यांवर शिवीगाळ
शरद पवार मोदींच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान; अजित पवारांनी सांगितले संभाव्य कारण
मनसेचा पोलिसांना अल्टिमेटम – चार दिवसात भोंगे हटवा अन्यथा…
IPL 2022 : आयपीएलमध्ये खतरनाक गोलंदाजी करणाऱ्या ‘या’ भारतीय खेळाडूवर रोहितचा डोळा; T20 विश्वचषक संघात लागू शकते वर्णी!
“एक दिवस रोनाल्डो म्हणून झोपेतून उठलो, तर पहिल्यांदा ‘ही’ गोष्ट करेन”, विराट कोहलीचं वक्तव्य चर्चेत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

