Share

IPL 2022 : असं गाणं तुम्ही ऐकलं नसेल..! RCBनं ड्रेसिंग रूममध्ये साजरा केला विजयोत्सव; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२२च्या १३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवरचा शानदार विजय एका वेगळ्याच सेलिब्रेशन गाण्याने साजरा केला. ड्रेसिंग रूममध्ये विजयानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी जोशात आनंद साजरा केला. आरसीबीला त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु त्यानंतर संघाने शानदार खेळ दाखवत कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थानवर शानदार विजय नोंदवला.

राजस्थानविरुद्ध आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला दिनेश कार्तिक, त्याने २३ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. कार्तिक सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने आरसीबीसाठी मागील ३ सामन्यांमध्ये नाबाद खेळी खेळली आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने आरसीबीला १७० धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात आरसीबीने ५ चेंडूंपूर्वी ७ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. यानंतर, आरसीबीने ड्रेसिंग रूममध्ये एक उत्सव साजरा केला.

”पँट लाल आहे. शर्ट निळा आहे. सोनेरी सिंह चमकत आहे. आम्ही आरसीबी आहोत. आम्ही धाडसी खेळत आहोत. स्वबळावर फायनलला जाऊ. एक चांगला संघ, जो तुम्हाला असा कधीही दिसला नसेल. बाकीचे संघ आम्हाला त्रास देऊ शकत नाहीत, मला आरसीबीकडून असल्याचा अभिमान आहे. आम्ही आरसीबी आहोत”, असे बोल असलेले गाणे खेळाडू गाताना दिसले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!