कोल्हापूर : कोरोना काळात शाळा बंद असतानाही शिक्षण मात्र सुरु होते. शिक्षण विभाग क्षिणाच्या माध्यमातून देशाचे भविष्य आणि राष्ट्राची संपत्ती घडवत आहे. ‘माझं शिक्षण माझं भविष्य या उपक्रमाबरोबर आदर्श शाळाही संकल्पना शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या कणेरीवाडी येथील विद्या मंदिरात डिजिटल शाळेचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पालकमत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार संजय मंडलीक, जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यावेळी म्हणाल्या कणेरवाडीच्या शाळेच्या चालत्या-बोलत्या भिंतीचा शिकवण देण्यासाठी आहेत. आता यापुढे कणेरावाडीचे नाव राज्यात घ्यावे लागेल शिक्षण आणि विद्यार्थ्यांनी राज्याचे नाव जगाच्या पातळीवर माठे करण्याचे काम केले आहे.शाळामधील गुणवत्ता पुढे कशी घेवून जायची हे आपलं पुढील धोरण आहे.सर्व मिळुन शिक्षणशेत्रात कोल्हापूरचे नाव मोठे करु असे सांगून इ. 8 वी चा वर्ग कणेरावाडी शाळेत देण्याची जबाबदारी माझी आहे असंही त्या म्हणाल्या.
खासदार मंडलीक यावेळी म्हणाले, कारोना सारख्या संकटाचे संधीत रुपांतर कसे करायचे ते कणेरीवाडीने दाखवून दिले आहे. लोकवर्गणीतून शाळेचे रुप पालटलं आहे. हे देशात पहिले आदर्शवत काम असेल.आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, 30 लाखाच्या लोक वर्गणीतून अभिमानास्पद काम कणेरावाडीने केले आहे. जिल्हा परिषदची आदर्श शाळा म्हणून या शाळेची ओळख होईल रोल मॉडेल म्हणून ही शाळा उदयास येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीमाता सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दिपप्रज्वलनाने झाली.
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर :अनावश्यक खर्च टाळून जनतेशी निगडित विषयाला महत्व द्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
- लसीकरणाची सुरुवात कोरोनाच्या लढाईतील महत्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल- सुभाष देसाई
- श्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध- छगन भुजबळ
- पुढील लोकसभा निवडणुकीत मागील मताधिक्याचा विक्रम तोडला जाईल : चंद्रकांत पाटील
- औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रलंबित प्रश्न सहा महिन्यात सोडवण्यासाठी प्रयत्न करू- आदित्य ठाकरे


