Share

सोलापूर :अनावश्यक खर्च टाळून जनतेशी निगडित विषयाला महत्व द्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : निधीच्या टंचाईमुळे सोलापूर महापालिकेने प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कल्पक उपाय अवलंबावेत. स्वयंसेवी संस्था, सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) यांची मदत घेऊन सोलापूर महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी स्रोत निर्माण करण्याचे निर्देश नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नियोजन भवन येथे महानगरपालिका एकत्रित विकास नियंत्रण नियमावली आढावा बैठकीत शिंदे बोलत होते. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, बबनराव शिंदे, शहाजीबापू पाटील, संजय शिंदे, राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक डेंगळे-पाटील आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, कोरोनामुळे निधीची कमतरता असली तरी शहरांचा विकास व्हावा, यासाठी नगर विकास विभागाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. अनावश्यक खर्च टाळून जनतेशी निगडित विषयाला महत्व द्यावे. मनपाने इतर मनपा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे. स्थानिक स्वयंसेवी संस्था, कलाकार यांची मदत घेऊन शहर सुशोभित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

शासनाने सर्व शहरांचे एकसूत्रीकरण करण्यासाठी विकास नियंत्रित नियमावली आणून क्रांतिकारक निर्णय घेतला. याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्यभर बैठकांचे आयोजन केले आहे. पूर्वी नियमावली वेगवेगळी असल्याने विकास कामाला आणि लोकप्रतिनिधी यांना अडचणीचे होते. या माध्यमातून एफएसआय गैरवापराला आळा बसेल. १५०० स्क्वेअर फूट बांधकामाला परवाना लागणार नाही, ३००० स्क्वेअर फूट बांधकामाला १० दिवसात परवाना मिळेल. व्यावसायिक इमारतींना वाढीव एफएसआय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी पर्यटनाला चालना मिळणार असून रोजगारही वाढणार असल्याचेही  शिंदे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!