🕒 1 min read
मुंबई : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली असून रात्री १० च्या आत होळी पेटवण्याचे बंधन असणार आहे. तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याकरिता डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात राम कदम यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘महाराष्ट्रसरकारचा एवढा टोकाचा हिन्दू सणांना विरोध का?आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत. आहो तुम्ही घाबरट असाल हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात.’
तुमच्याच भाषेत.. काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा #हिन्दू सण जल्लोषात साजरा करणारच #holikadahan
— Ram Kadam (@ramkadam) March 17, 2022
दरम्यान, तुमच्याच भाषेत…काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच’, असे राम कदम म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार”, अजित पवारांचा निर्धार
- “बारामती म्हणजेच यांचा महाराष्ट्र आहे”, राम सातपुतेंचा शरद पवारांवर निशाणा
- IPL 2022: चेन्नईच्या चाहत्यांसाठी खुशखबर; ‘हा’ स्टार खेळाडू सुरत कॅम्पमध्ये पोहचला
- “…तर परीक्षा केंद्र कायमचे रद्द केले जाणार”, वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय
- चीनच्या मानगुटीवर बसलेले कोरोनाचे भूत उतरायला तयार नाही- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
