🕒 1 min read
Congress । मुंबई : देशात सध्या महागाईचा प्रमाण वाढत चाललं आहे. याच महागाईवरून केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. दिल्लीत आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून भाजपचा निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्रात नाना पटोले, संजय निरुपम आणि भाई जगताप यांच्या नेतृत्वात उग्र निदर्शने करण्यात आली. भाजपच्या विरोधात जोरदार घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून काढलं. राजभवनावर काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या मार्चला मध्येच रोखून नाना पटोले आणि भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तर पुढे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतलं हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू केली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम तसंच माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, अस्लम शेख, अशोक चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान, यावेळी दिल्ली पोलिसांनी या मोर्चासाठी काँग्रेसला परवानगी दिलेली नसल्याने परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनात राहुल गांधी आणि पक्षाच्या सर्व नेत्यांनी काळे कपडे परिधान करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विनापरवानगी आंदोलन केल्याच्या आरोपांखाली दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलं. तर प्रियंका गांधी यांना अक्षरश:फरफटत पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आंदोलनात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Congress | देशात लोकशाहीची हत्या, भाजपविरोधात राहुल गांधी आक्रमक! पोलिसांनी घेतले ताब्यात
- Rahul Gandhi | देशातील प्रत्येक संस्थेत RSS चा एक व्यक्ती बसलेला आहे – राहुल गांधी
- Congress । राहुल-प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; अक्षरश: फरफटत घेऊन गेले
- Thackeray vs Shinde | ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाला झटका ; बीड तालुक्यात शिंदे गटाने फडकवला झेंडा
- Rakhi sawant | राखी सावंतच्या बॉयफ्रेंडला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; पहा व्हायरल VIDEO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
