मुंबई : विधीमंडळाच्या अधिवेशनात बोलत असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
यासंदर्भात बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.’ तसेच राज्यातील जनतेवर करवाढीचा कोणताही बोजा न देता कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योगक्षेत्राच्या विकासाच्या पंचसुत्रीमुळे राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘अर्थसंकल्पात घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची आणि केलेल्या घोषणांची अंमलबजावणी सर्वशक्तीनिशी केली जाईल’, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Ranji Trophy: अबब! एकाच सामन्यात ‘१०००’ धावांची लीड ; झारखंडने नागालँडची खिल्ली उडवली!
- नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
- IPL 2022: जिमी नीशमने आयपीएलच्या नवीन नियमांबाबत दर्शवली नाराजी; चाहत्यांनी ट्विटरवर झापले
- “…तर परीक्षा केंद्र कायमचे रद्द केले जाणार”, वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय
- चीनच्या मानगुटीवर बसलेले कोरोनाचे भूत उतरायला तयार नाही- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

