Share

“बारामती म्हणजेच यांचा महाराष्ट्र आहे”, राम सातपुतेंचा शरद पवारांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बिबट्या सफारी कुठे होणार असा प्रश्न पुणे जिल्ह्यात चर्चेत होता. पण आता ही सफारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात होणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे. पुण्यातील वनविभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान यावरूनच भाजप नेते राम सातपुते (Ram Satpute ) यांनी थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे.

“बारामती म्हणजेच यांचा महाराष्ट्र आहे. पवारांना वाटते बारामती चा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास. जुन्नर सारख्या निसर्गरम्य तालुक्यात हा प्रकल्प करता आला असता पण सगळंच बारामतीला .महाराष्ट्र उपाशी बारामती तुपाशी.”, अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे.

दरम्यान बारामती तालुक्यातील गाडीखेल येथील १०० हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी बिबट्या सफारीसाठी ६० कोटींच्या निधीची तरदूत केलेली आहे.

दरम्यान बारामतीला हलवलेली बिबट्या सफारी पुन्हा जुन्नरला आणावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी केली आहे. पुणे पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर जुन्नरला बिबट्या सफारीचा प्रकल्प जाहीर झाला होता. पण कालांतरांने तो प्रकल्प बारामतीला जात असल्याचे वन खात्याकडून जाहीर करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!