Share

लसीकरणाची सुरुवात कोरोनाच्या लढाईतील महत्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल- सुभाष देसाई

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद – गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत संसर्गाला रोखण्याच्या दिशेने लसीकरणाची सुरुवात हे एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी काल जिल्ह्यातील लसीकरण शुभारंभ प्रसंगी केले.

रेल्वे स्टेशन रोडवरील बंसीलाल नगर मनपा आरोग्य केंद्र येथे औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेची सुरुवात काल पालकमंत्री देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आ. संजय शिरसाठ, अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तीक कुमार पांडेय, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्यासह संबंधित मान्यवर, लसीकरण लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, आज देशभरात लसीकरण मोहिमेची सुरुवात होत असून जिल्ह्यातही आज 10 केंद्रांवर एक हजार जणांना लस देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरापासून आपण सर्वांच्या साथीने कोरोना विषाणुविरोधात जो लढा देत आहोत त्यातील एक महत्वाचे आणि दिलासादायक पाऊल आपण लसीकणाच्या माध्यमातून आज टाकत आहोत ते निश्चितच यशस्वी होईल, असे सांगून देसाई म्हणाले, कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील असून या लसीमुळे आपल्या सर्वांना या रोगापासून संरक्षण प्राप्त व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. ती यशस्वी होत सर्वांना आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा लसीकरण मोहिमे निमित्त व्यक्त केले.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढते राहिलेले असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने सुरु असलेले आपल्या सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील, याची खात्री आहे. मात्र तरीही जनतेने खबरदारी कायम ठेवत मास्कचा वापर व इतर नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील लसीकरणाचे पहिले मानकरी बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र वैद्य यांनी लसीकरण मोहिमेची सुरुवात ही महत्वपूर्ण बाब असून जनतेने कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन करुन डॉ. वैद्य यांनी कोरोना लस घेण्याचा पहिला मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!