🕒 1 min read
मुंबई: गतविजेता चेन्नई सुपर किंग्स त्यांचे दोन प्रमुख खेळाडू सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि अष्टपैलू दीपक चहर यांच्या दुखापतीशी झुंज देत आहेत. आयपीएलमध्ये चहर सीएसके मध्ये केव्हा परतेल हे अद्याप अस्पष्ट असले तरी, अखेरीस चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. कारण युवा सलामीवीर ऋतूराज गायकवाड सुरत येथे सुरू असलेल्या प्री-सीझन कॅम्पमध्ये सामील झाला आहे.
ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad) बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीतून बाहेर येत होता. आता तो सुरत येथे सुरू असलेल्या सीएसकेच्या प्री-टूर्नामेंट कॅम्पमध्ये सामील होण्यासाठी वेळेत बरा झाला आहे. गायकवाड हा गेल्या मोसमात सीएसकेसाठी केवळ स्टार फलंदाज ठरला नाही तर त्याने ६३५ धावा केल्या आणि संघाचा ऑरेंज कॅप होल्डर म्हणून स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे.
Reeling with joy when he comes IN! ????#WhistlePodu ???????? @Ruutu1331 pic.twitter.com/pCGSBkQvzR
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 16, 2022
चेन्नई त्यांच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात मुंबईत २६ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध करेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत मनगटाला दुखापत झाल्याने गायकवाड श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका खेळू शकला नव्हता.उजव्या क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे गोलंदाज चहर पहिले काही सामने मुकणार असल्याची शक्यता आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम T20I दरम्यान त्याला दुखापत झाली होती.
महत्वाच्या बातम्या
- Ranji Trophy: अबब! एकाच सामन्यात ‘१०००’ धावांची लीड ; झारखंडने नागालँडची खिल्ली उडवली!
- चीनच्या मानगुटीवर बसलेले कोरोनाचे भूत उतरायला तयार नाही- संजय राऊत
- “…तर परीक्षा केंद्र कायमचे रद्द केले जाणार”, वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय
- IPL 2022: जिमी नीशमने आयपीएलच्या नवीन नियमांबाबत दर्शवली नाराजी; चाहत्यांनी ट्विटरवर झापले
- नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
