मुंबई:मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (१२ एप्रिल) उत्तर सभा घेतली यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरल्याचा त्यांना आणि शिवसेनेला गर्व असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.
“मी आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल बोललो. ते मला हेच म्हणाले किरीट सोमय्या यांना मी शिवराळ भाषा का वापरली याचा अभ्यास जर त्यांनी केला असता तर एक मराठी माणूस म्हणून त्यांना माझ्या वेदना कळल्या असत्या. याच किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची नसावी यासाठी कोर्ट गाठले होते. अशा मराठी भाषिकाविरोधात मी शिवराळ भाषा वापरली. किरीट सोमय्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी प्रेजेंटेशन केले आहे. याला संतापून जर माझ्या तोंडून शिवी बाहेर पडत असेल तर मी त्याला शिवी म्हणतच नाही. ती त्यांची लायकीच आहे.तो एक मराठी माणसाच्या शिवसेनेच्या तोंडून निघालेला अंगार आहे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
नुसत्या मालमत्ता जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या द्यायला लागले. काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ**, चु** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’ म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे, शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं. त्यामुळे संजय राऊत हे नेमके कुठले हेच कळत नाही. शिवसेना की राष्ट्रवादी? असा खोचक सवाल करत राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
उत्तराखंडमध्ये काँग्रेसचं बदललं चित्र; पक्षाचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर
“राज ठाकरे भाजपचाच भोंगा”, संजय राऊत यांचा पलटवार
“…तर किरीट सोमय्यांना ‘शिवतीर्थ’वर बोलवून सत्कार करा”, संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
“त्यांना फार महत्व देऊ नका, योग्य वेळी मी…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

