मुंबई : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून संस्थेच्या विश्वस्तांना धमकावल्याच्या गुन्हा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर दाखल आहे. महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्याविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द व्हावा आणि या प्रकरणी सुनवाई सुरु असेपर्यंत आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी, महाजन व नाईक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यावेळी महाजन, नाईक यांच्यासह या प्रकरणातील इतर आरोपींना अटकेपासून संरक्षण दिले होते.
आता आपल्यावरील या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे देण्यात यावे अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. महाजन यांच्यासह अन्य आरोपींनी यासाठीची मागणी केली आहे. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी महाजन यांच्यासह अन्य काही आरोपींनी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली.
यामुळे आता राज्य सरकारच्या यंत्रणांवर महाजन यांचा विश्वास नाही का ? केंद्रीय तपास यंत्रणांसाठी भाजप नेत्यांची इतकी का ओढ आहे असा प्रश्न विचारला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
“मी त्याला शिवी म्हणतच नाही तो शिवसेनेच्या तोंडून…”, संजय राऊतांचा पलटवार
उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; १० आमदार भाजपाच्या वाटेवर?
“माझ्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला हवं होतं कारण…”, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
“राज ठाकरे भाजपचाच भोंगा”, संजय राऊत यांचा पलटवार
“…तर किरीट सोमय्यांना ‘शिवतीर्थ’वर बोलवून सत्कार करा”, संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
