🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर सभा घेतली. या सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेची चिरफाड केली. आपल्या खास शैलीत त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान या सभेमुळे राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्यासपीठावर केलेली कृती त्यांना चांगलीच महागात पडणार आहे.
भाषणाला सुरवात करण्यापूर्वी राज ठाकरे यांना ठाण्यातील मनसैनिकांकडून तलवार भेट देण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे यांनी ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. या कारणावरून आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर राज ठाकरे यांचे भाषण देखील तपासण्यात येणार आहे. त्यांच्या भाषणात काही आक्षेपार्ह वक्तव्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा
काल (मंगळवार) सभेला सुरवात करताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावर त्यांनी भाष्य केलं. तसेच त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. ३ मे (ईद) पर्यंत भोंगे काढण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा. आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही, असा इशारा त्यांनी दिला.
शरद पवार हे नास्तिक
यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांवर तुफान फटकेबाजी केली. या महाराष्ट्रात जातीचं राजकारण पवारांनी सुरु केलं. ते फक्त शाहू फुले आंबेडकर याचं नाव घेतात पण, शिवाजी महराजांचं नाव घेत नाहीत. कारण शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर मुसलमान मते मिळत नाहीत. शरद पवार हे नास्तिक असून त्यांना देवधर्माशी काही देणं घेणं.
महत्वाच्या बातम्या :
“मी त्याला शिवी म्हणतच नाही तो शिवसेनेच्या तोंडून…”, संजय राऊतांचा पलटवार
उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; १० आमदार भाजपाच्या वाटेवर?
“माझ्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला हवं होतं कारण…”, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
“राज ठाकरे भाजपचाच भोंगा”, संजय राऊत यांचा पलटवार
“…तर किरीट सोमय्यांना ‘शिवतीर्थ’वर बोलवून सत्कार करा”, संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
