Share

उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; १० आमदार भाजपाच्या वाटेवर?

Published On: 

🕒 1 min read

देहराडून : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसचे चित्र पलटले आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला सत्तेत येण्याची उत्तम संधी होती पण पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले. रविवारी काँग्रेसच्या हायकमांडने प्रदेशाध्यक्ष म्हणून रानीखेत येथून निवडणूक हरलेले करण माहरा यांना बनविले तर विरोधी पक्षनेता म्हणून ऐन निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये आलेले यशपाल आर्य यांना बनविले. या फेरबदलांमुळे काँग्रेसमध्ये अनेक बडे नेते नाराज झाले असल्याचे चित्र आहे.

यामधील अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात गेले आहेत. तसेच भाजपा या आमदारांना पक्षात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात २०१६ सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. सध्यातरी काँग्रेसचे आठ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. ते लवकरच भाजपाच्या संपर्कात येऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यशपाल आर्य यांना विरोधी पक्षनेता आणि करण माहरा यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आल्याने अनेकजण नाराज आहेत.

आता काँग्रेसचे १० आमदार आज देहराडूनमध्ये गोपनीय बैठक आयोजित करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये आमदार हरीश धामी, मनोज तिवारी, मदन बिस्ट, मयूर महर, खुशाल सिंह अधिकारी, ममता राकेश, विक्रम नेगी, राजेंद्र भंडारी सहभागी होऊ शकतात. काँग्रेसकडून उपेक्षा होत असलेल्याने नाराजी असलेले काही आमदार लवकरच काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  

महत्वाच्या बातम्या –

“माझ्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला हवं होतं कारण…”, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
“राज ठाकरे भाजपचाच भोंगा”, संजय राऊत यांचा पलटवार
“…तर किरीट सोमय्यांना ‘शिवतीर्थ’वर बोलवून सत्कार करा”, संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
“त्यांना फार महत्व देऊ नका, योग्य वेळी मी…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
“संपादक जेलमध्ये जाणार म्हणून…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्वीटला ‘मनसे’चे प्रत्युत्तर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!