Share

‘OBC आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारच्या षड्यंत्रावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) माहिती तयार करण्याची जबाबदारी सोपिवण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाला ४३५ कोटी रुपयांची मागणी केली असताना राज्य सरकारने केवळ ५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आयोगाला तातडीच्या खर्चासाठी म्हणून आकस्मिकता निधीतून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

ओबीसी आयोगाला केवळ पाच कोटी दिल्याने ओबीसी आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारचे षडयंत्र आहे, यावरुन पुन्हा एकदा शिक्कामोतर्बक झाले आहे, असे भातखळकर म्हणाले आहेत.

यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अधांतरी राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करण्याची माहिती जमा करून तसेच ५० टक्क्याच्या मर्यादिचे पालन करुन हे आरक्षण पुनर्स्थापीत करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. ही प्रक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून पार पाडायची आहे. त्यासाठी समर्पीत आयोग स्थापन करण्याची सूचना न्यायालयाने राज्य सरकारला केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!