Share

Sanjay Raut | …तर तुमच्या शिव्यांचं महाराष्ट्र कौतुक करेल, पण… ; संजय राऊतांचे गायकवाडांना चॅलेंज

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | नाशिक : शिंदे गटातील आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यांना गद्दारी शांतपणे जगू देणार नाही, असा घाणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे केला होता. यावर शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पलटवार करत शिवराळ भाषेचा वापर केला होता. त्यांनी संजय राऊत यांना थेटी शिवीगाळ केली होती. यावर संजय राऊत यांनी संजय गायकवाड यांना आव्हान दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “मला कोणी गद्दार म्हटल्यावर शिव्या देत असेल, तर तो माझा सन्मान आहे. कारण ते गद्दार आहेत. त्यांना उत्तम शिव्या देता येत असतील, तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते मंत्री यांना द्यावात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल.”

काय म्हणाले होते संजय गायकवाड-

संजय गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दारीचा आरोप लागणार नाही. तर क्रांतीचा उठाव केल्याचा अभिमान पुढच्या पिढीवर लागणार आहे. मादxxx संजय राऊत तू याच्यानंतर अशी भाषा वापरू नको. जनतेला आमचा निर्णय मान्य आहे. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जी हातमिळवणी केली, ती जनतेला मान्य नाही. आम्हाला शिवसेना-भाजप म्हणून लोकांनी निवडूण दिले होते. आम्ही दाखवून देऊ आमच्या किती जागा महाराष्ट्रात येणार आणि तू तुझा पक्ष किती भूईसफाट करतो ते”.

शिंदे गटातील आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का –

शिंदे गटातील आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. दिवार चित्रपटात अमिताभच्या हातावर होते, मेरा बाप चोर है. तशे यांचे नातेवाईक, यांचे पोर, यांच्या बायका, हे म्हणतील, लोक म्हणतील हे गद्दार आहेत. यांच्या कपाळावर शिक्का गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यांना गद्दारी शांतपणे जगू देणार नाही,” असे संजय राऊत म्हणाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान सुरु आहे. तुमची क्रांती कुठ आहे? क्रांतीची वांती झाली का?. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मला आदर आहे. गुजरातच्या एका प्रचार सभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाषणाच्या ओघात नरेंद्र मोदी हे शंभर तोंडाचे रावण आहेत का?. त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान आहे. गुजरातच्या सुपूत्राता अपमान आहे. पण महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान होऊन भाजप आणि शिंदे गट गप्प बसला आहे. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?. भाजपच्या विचारातील हा फरक समजून घ्यायला हवा, असे संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!