ND vs PAK, Asia Cup 2022 : भारतीय संघाला आज (28 ऑगस्ट) आशिया कप 2022 हंगामातील पहिला सामना खेळायचा आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. चाहतेही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आशिया कपमध्ये भारतीय संघ सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत आहे. तर पाकिस्तानची स्थिती श्रीलंकेपेक्षाही वाईट आहे. आशिया चषक पहिल्यांदा 1984 मध्ये आयोजित करण्यात आला होता. भारताने 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे.
पाकिस्तानने दोन वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले-
तर दुसरा यशस्वी संघ श्रीलंका आहे, जो 5 वेळा चॅम्पियन होता. त्याचबरोबर पाकिस्तानने दोन वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. दोन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये (ODI आणि T20) आशिया कप जिंकणारा भारत हा एकमेव संघ आहे. ज्याने दोन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये (ODI आणि T20) आशिया कप जिंकला आहे. यावेळीही आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे, ज्यामध्ये आशिया कपमध्ये 6 संघ सहभागी होतील..
हे दोन गटात विभागलेले आहेत. भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग अ गटात आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत. यावेळी स्पर्धेतील सर्व 6 संघांमध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. यातील 10 सामने दुबईत तर तीन सामने शारजाहमध्ये होणार आहेत.
कुठे पाहणार सामना –
सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल. तसेच Disney+Hotstar अॅपवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
भारताची संभाव्य प्लेइंग 11 –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs PAK | “माझ्या हातात असते तर…” ; सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर रोहित शर्माचे मोठे विधान
- Karuna Munde | 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी करुणा मुंडे यांनी नोंदवला गुन्हा, आरोपी धनंजय मुंडेंच्या परिचयाचे
- Rohit Pawar | राकेश वाधवान मनी लॉन्डरिंग प्रकरणी रोहित पवार अडकणार ? पवार ED च्या रडारवर
- Narendra Modi | गुजरात दौऱ्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी घेतली त्यांच्या आईची भेट
- India vs Pakistan | सामन्यापूर्वीच पाक संघाला भारताचा धाक! पाकिस्तानी माजी गोलंदाजाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

